नमस्कार मंडळी!

बघता बघता आपण साल २०२० च्या अखेर च्या आठवड्यात येउन पोचलो! तसे म्हणायला हे साल २०२० आपल्यालाच काय, संपूर्ण जगालाच कधी संपतय असं झालय, पण संपूर्ण जगा प्रमाणेच आपल्या मंडळानेही ॲानलाईन माध्यमाद्वारे या कोरोना काळातल्या बंधनावर मात करून विविध कार्यक्रमांद्वारे आपले मनोरंजन तर केलेच, पण सर्वांचे मनोबलही कायम ठेवलय!

तर मंडळी, आपल्या मंडळाची २०२१ ची कमिटी आपल्यासाठी या नवीन वर्षाचा पहिला वहीला कार्यक्रम म्हणजेच मकर-संक्रांत साजरा करण्यास सज्ज झाली आहे.

तसे मकर-संक्रांत हे निमित्त साधून आम्ही जानेवारी महीन्यात विविध ॲानलाईन कार्यक्रम आपल्यासाठी आणणार आहोत, पण त्यातला एक कार्यक्रम असा आहे की त्यात आपणा सर्वांनाही स्वत: सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, अर्थात कोविड-कोरोनाची यथावश्यक खबरदारी बाळगूनच!!

आपणास कल्लोळ एंटरटेनमेंट हे नाव माहीतच आहे. खास मकरसंक्रातीच्या निमित्ताने २३ जानेवारी २०२१ रोजी शिकागो वेळेप्रमाणे संध्याकाळी ७:३० वाजता कल्लोळ घेऊन येत आहे एक धमाकेदार प्रस्तुती – लावण्यवती!
या लावण्यवतीची रंगत आणखी वाढवण्यासाठी कल्लोळ घेऊन येत आहेत लावणी-नृत्य स्पर्धा!!

“कोण होणार लावण्यवती?? ”

आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या मंडळात उत्कृष्ट नॄत्यांगना आहेत.
तर आपल्या सर्वांच्या वतिनं मंडळाची त्यांना आग्रहाची विनंति की त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे व आपली प्रतिभा संपूर्ण उत्तर अमेरिकेसमोर सादर करावी व अनुषंगाने आपल्या मंडळाचे नाव ही सर्वश्रुत करावे.
स्पर्धेचे नियम अगदी साधे सोपे आहेत. नियमांसाठी आणि अधिक माहितीसाठी सोबत दिलेली माहीती जरूर पहा https://drive.google.com/…/1N2LUzivTVuKlR5AXTB9Ymj…/view